Ad will apear here
Next
स्वतःची लेखनशैली निर्माण करा : डॉ. अरुणा ढेरे
साहित्य परिषदेत साधला कुमारवयीन लेखकांशी संवाद

पुणे : ‘लेखक होण्यासाठी कल्पनाशक्तीबरोबरच निरीक्षणशक्ती असली पाहिजे. अनुभव आपल्या शब्दात मांडता आले पाहिजेत. भाषा आणि अर्थाच्या छटा समजल्या पाहिजेत, शब्दांच्या पलीकडले शब्दांत मांडताना स्वतःची लेखनशैली निर्माण केली पाहिजे’, असा सल्ला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

‘छात्र प्रबोधन’ मासिकातर्फे कुमारांसाठी आयोजित राज्यस्तरीय  निवासी लेखन-संपादन कार्यशाळेतील सहभागी कुमार लेखकांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला भेट दिली, त्या वेळी डॉ. ढेरे बोलत होत्या. परिषदेतील माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, छात्र प्रबोधनच्या कार्यकारी संपादक शिल्पा कुलकर्णी, मानद संपादक शैलजा देशमुख हे उपस्थित होते. 

डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘मी लिहायला लागले होते, तेव्हा पद्मा गोळे, संजीवनी मराठे आणि इंदिरा संत यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले. उद्याच्या साहित्याची पालखी तुमच्या खांद्यावर आहे. या क्षेत्रात प्रत्येकाला उभे राहण्याची संधी आहे त्यासाठी भरपूर वाचन करा आणि संकोच न करता लिहा. परंपरा समजून घ्या आणि वर्तमानाच्या आतही डोकावून पाहा.’

प्रा. जोशी यांनी साहित्य परिषदेचा इतिहास कुमारांना सांगितला. ते म्हणाले, ‘अनुभवामुळेच लेखन कसदार होते. केवळ पाठ्यपुस्तके वाचून पंडित होऊ नका अनुभव आणि संवेदनांचे पंख लावून उंच भरारी घ्या. हे जग उघड्या डोळ्यांनी पाहा. ज्याला माणूस वाचता येतो तोच उत्तम लेखक होऊ शकतो.’ 

कार्यशाळेतील सहभागी कवींनी कवितांचे सादरीकरण केले. शिल्पा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी कुमारांनी डॉ. ढेरे आणि प्रा. जोशी यांच्या स्वाक्षरीसाठी त्यांच्याभोवती गर्दी केली होती. साहित्य परिषदेतर्फे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा ‘डॉ. रा. चिं. ढेरे स्मृती विशेषांक’, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते कुमारांना भेट देण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZZKCB
Similar Posts
वैभवी वाटचाल... ११० वर्षांची आद्य साहित्य संस्था अशी ओळख असलेल्या पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने २६ मे रोजी १११व्या वर्षात पदार्पण केले आहे. साहित्य, संस्कृती, समीक्षा, मराठी, भाषा यांच्या संवर्धनासाठी ही साहित्य परिषद गेली ११० वर्षे कार्यरत आहे. वर्धापनदिनानिमित्ताने परिषदेच्या आजवरच्या कार्याचा मांडलेला लेखाजोखा....
‘यू-ट्यूब चॅनेलद्वारे प्रत्येकाला सेलेब्रिटी बनण्याची संधी’ पुणे : ‘सोशल मीडियाच्या युगात आपली सर्जनशील निर्मिती जगभरातील लाखो लोकांपर्यंत थेट पोहोचवून प्रत्येकाला सेलेब्रिटी बनण्याची संधी यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे’, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, यू-ट्यूबर आणि ‘साहित्य सेतू’चे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले.
साहित्य परिषदेत संत सावता माळी यांचे पुण्यस्मरण पुणे : ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम... पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम..’, असा गजर करत निघालेली दिंडी, टाळ, मृदूंग आणि चिपळ्यांचा नाद याने भारावलेले माधवराव पटवर्धन सभागृह, अशा वातावरणात संत सावता महाराजांचे चरित्रकथन आणि अभंग गायनातून संत सावता माळी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेत अभिवादन करण्यात आले
शाहिरीने दुमदुमली साहित्यपंढरी पुणे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्यिकांची शाहिरी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाहीरांनी नामवंत कवींचे पोवाडे सादर केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language